कारंजात मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
कारंजा (घा.), 
'Karanja': Attempted robbery काही दिवसांपासून शहराच्या विविध भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरांना लक्ष्य करण्यासोबतच आता नागरिक झोपेत असताना चोरट्यांकडून दरोड्याचाही प्रयत्न होत आहे. दरम्यान, १५ रोजी मध्यरात्री विशाल भांगे यांच्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
 
 
daroda
 
मिळालेल्या माहितीनुसार, बिहाडी मार्गावरील ठेकेदार विशाल भांगे यांच्या घरी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून घरातील हॉलमध्ये आणि स्वयंपाक खोलीत प्रवेश केला.भांगे यांच्या आई झोपून असलेल्या बेडरूमचा दरवाजा चोरांनी बाहेरून लावून घेतला आणि विशाल भांगे झोपून असलेल्या बेडरूमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना आवाज आला असता शेजारीच राहणार्‍या मोठ्या भावाला फोन केला. त्यांचे भाऊ उठून बाहेरचा लाईट लावताच चोरट्यांनी पोबारा केला. सुदैवाने त्यांच्या घरातील कोणताही ऐवज चोरीला गेला नाही. घरमालकाच्या सावधगिरीने चोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला.
 
 

'Karanja': Attempted robbery  सदर घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून एक चोर सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये दिसून आला आहे. चोराने काळा पॅन्ट आणि लाल टी-शर्ट घातली असून तोंडाला बांधलेले दिसून येत आहे. त्याच्यासोबत आणखीन दोन ते तीन साथीदार असावे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कारंजा शहरात दोन ते तीन दिवसाआड घरफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.