तीन आराेपींनी पाेलिस उपनिरीक्षकावर केला चाकूने हल्ला

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
- आराेपी गेले पळून आणि पाेलिस झाले हतबल
 
अनिल कांबळे
नागपूर, 
विना क्रमांकाच्या दुचाकीने ट्रीपलसिट जाणाऱ्यांना अडविल्यानंतर एका आराेपीने Knife attack on police sub-inspector पाेलिस उपनिरीक्षकावर चाकूने हल्ला केल्याची घटना खळबळजनक घटना कळमना हद्दीत डिप्टी सिग्नल येथील गाेपालनगरात घडली. सचिन बाळासाहेब वाकळेकर (36) रा. लकडगंज पाेलिस वसाहत असे जखमी पाेलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते सध्या कळमना पाेलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
 
 
chaku
 
Knife attack on police sub-inspector  मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 9 च्या सुमारास डिप्टी सिग्नल येथे दाेन वाहनचालकांमध्ये किरकाेळ कारणावरून वाद सुरू हाेता. ही माहिती कळमना पाेलिसांना समजताच पाेलिस उपनिरीक्षक सचिन वाकळेकर हे विलास सहारे (42) या हाेमगार्डसह घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथे विना क्रमांकाची दुचाकी उभी हाेती आणि एकजण रस्त्यात बसला हाेता. वाकळेकर रस्त्यावर बसलेल्या व्यक्तीची विचारपूस केली असता विना क्रमांकाच्या दुचाकीवरील तिघांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. वाकळेकर यांनी हाेमगार्ड सहारे यास दुचाकी ताब्यात घे, असे म्हटले असता अज्ञात तीन आराेपी तेथे आले. वाकळेकर यांनी त्यांना नंबर प्लेट का लावली नाही, अशी विचारणा केली. त्यावर एकाने वाकळेकर यांना शिवीगाळ करीत ‘माझ्या गाडीला काेण हात लावताे ते पाहताे’ असे अशी धमकी दिली आणि त्याने कंबरेला खाेचलेला चाकू काढून वाकळेकर यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. ताेच वाकळेकर हे मागे हटल्याने चाकूचा वार उजव्या खांद्यावर बसला. याप्रकरणी कळमना पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अन् पाेलिसांचीच बुलेट घेऊन पळाले आराेपी
सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पाेलिसांचा गुन्हेगारांवर वचक असणे गरजेचे आहे. मात्र, पाेलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी सचिन वाकळेकर हे तीनही आराेपींकडे चाकू बघून घाबरले. त्यानंतर त्यानंतर आराेपींनी वाकळेकर यांना धमकी देऊन बुलेट घेऊन पळून गेले. काही अंतरावर बुलेट गाडी साेडून आराेपी पळून गेले. मात्र, आराेपींनी चक्क उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची बुलेट हिसकावून नेल्यामुळे पाेलिस स्वतःचीच सुरक्षा करण्यात कमी पडले तर सामान्य नागरिकांची सुरक्षा काय करणार, अशा सवाल विचारल्या जात आहे.