मुंबई
Maharashtra 50 kg bag राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांच्या वजनाबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता शेतमालाच्या गोण्यांचे कमाल वजन ५० किलो इतके निश्चित करण्यात आले असून, त्यापेक्षा जास्त वजनाच्या गोण्या भरणे आणि वाहतूक करणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
माथाडी कामगार संघटनांकडून सातत्याने ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या दुखापतींबाबत तक्रारी करण्यात येत होत्या. त्याची दखल घेत सरकारने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा तसेच स्थानिक स्तरावरील मागण्यांचा विचार करून ही मर्यादा निश्चित केली आहे. यामुळे बाजार समित्यांमधील माल हाताळणी प्रक्रियेत मोठा बदल अपेक्षित आहे.या निर्णयानुसार कांदा, बटाटा, धान्य तसेच इतर शेतमालाची पॅकिंग आणि वाहतूक करताना गोण्यांचे वजन ५० किलोपेक्षा अधिक ठेवता येणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बाजार समित्या आणि व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कामगारांनी ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वजन उचलण्यास नकार दिल्यास त्याची अंमलबजावणीही प्रशासनाकडून पाहिली जाणार आहे.दरम्यान, या निर्णयामुळे शेतमालाच्या हाताळणीची पद्धत अधिक Maharashtra 50 kg bag शिस्तबद्ध आणि सुरक्षित होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र काही व्यापारी व बाजार घटकांकडून प्रारंभी व्यवहारात अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय अंमलात आणला जाणार असल्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत.