जाम येथे अधिकारी एसीत नागरिक डिसीत

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
उन्हाचा तडाखा अन् लो व्होल्टेज
 
 
समुद्रपूर, 
Mahavitaran: Low Voltage वर्धा जिल्हाने उष्णतेच्या बाबतीत देशात ७ वा क्रमांक गाठला. तापमान ४३ डिग्री सेल्सिअसच्या वर गेले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील जाम येथील नागरिकांना लो व्होल्टेजचा सामना करावा लागतो आहे. कुलर, पंखे काम करीत नाही.
 
 
Mahavitaran
 
Mahavitaran: Low Voltage  येथे महावितरण कंपनीच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची जागा रित असून प्रभारी म्हणून मांडगाव येथील अभियंता काम सांभाळत आहे. जाम येथील पेंडके कॉलनीसह गावातील अनेक भागात गेल्या वर्षापासून लो व्होल्टेजची समस्या आहे. काही नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. अनेक भागातील पथदिव्यांचा सुद्धा कमी दाबामुळे व्होल्टेज मुळे उजेड पडत नसल्याने नागरिकांना येणे जाण्याकरिता त्रास सहन करावा लागतो आहे. नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाला निवेदन दिले. मात्र, विद्युत महावितरण कंपनीच्या वतीने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही. आता तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कमी दाबामुळे नागरिकांना दिवसरात्र उष्णतेत जगण्याची वेळ आली आहे. त्याचा सर्वाधिक फटका लहान मुले व वृद्धांना सहन करावा लागतो आहे. कमी दाबाची समस्या दूर करावी, अशी मागणी जाम येथील माजी सरपंच सचिन गावंडे व गावकर्‍यांनी केली आहे.