मृतदेहाची राख...बकऱ्याचे काळीज रात्री चाले भोंदूचा अघोरी खेळ

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
मुंबई
Malad baba arrest राज्यात एकीकडे नाशिकमधील कथित प्रकरणांवरून सुरू असलेली चर्चा थांबत नाही तोच, आता मुंबईतही भोंदूबाबाच्या कारवायांमुळे खळबळ उडाली आहे. मालाड पूर्व परिसरात अघोरी कृत्ये आणि जादूटोण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून रिदम पांचाळ (वय ३७) या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
 

Malad baba arrest Mumbai, Rhythm Panchal baba case, black magic arrest Mumbai 
मिळालेल्या माहितीनुसार, रिदम पांचाळ हा मागील दोन वर्षांपासून रविवार आणि गुरुवार या दिवशी “अंगात देवी येते” असा दावा करत कथित अघोरी विधी करीत असल्याचे सांगितले जाते. भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली तो रात्रीपासून सकाळपर्यंत विविध प्रकारचे विधी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, ४ एप्रिल रोजी त्याने सार्वजनिक उद्यानात शेकडो लोकांसमोर जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा दावाही करण्यात आला आहे.उपचाराच्या नावाखाली तो बकऱ्याचे काळीज, स्मशानातील राख, लिंबू, टाचण्या, दारूची बाटली, सिगारेट, काळे आणि लाल कापड तसेच कुंकू अशा वस्तू मागवत असे आणि त्यांचा वापर अघोरी विधींमध्ये केला जात असे. हे साहित्य चौकात ठेवण्यास सांगून लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
 
 
या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या Malad baba arrest  स्थानिक नागरिकांनी एकत्र येत सुमारे ६५ ते ७० जणांच्या स्वाक्षऱ्यांसह तक्रार दाखल केली. फोटो आणि व्हिडिओ पुराव्यांसह ही तक्रार दिंडोशी पोलिसांकडे सादर करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रिदम पांचाळला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने मात्र सर्व आरोप फेटाळून लावत आपण केवळ धार्मिक पूजा आणि लोकसेवा करत असल्याचा दावा केला आहे.मुंबईसारख्या महानगरातही अशा प्रकारच्या घटनांमुळे अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील तपास दिंडोशी पोलीस करत आहेत.