तपास योग्य दिशेने : मुश्ताक पठाण
लैंगिक शोषण प्रकरण
अचलपूर,
Minority Commission in Parthwada sexual abuse case परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी अल्पसंख्याक आयोगाचे पथक गुरूवारी परतवाडा शहरात दाखल झाले. मुश्ताक पठान अल्पसंख्याक आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी (नागपुर ), यांच्यासह ९ सदस्यी पथक एसआयीटी प्रमुख शुभम कुमार यांना भेटले. दोन तास त्यांनी चर्चा केली.
Minority Commission in Parthwada sexual abuse case मुलींचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्या प्रकरणी अयान अहमद तनविर अहमद यांच्यासह अन्य सात आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पथकातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, नम्रता कडू, किर्ती सगणे, भुषन कावरे यांच्यासह इतर सदस्यांनी एसआयटी प्रमुख शुभम कुमार यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेतली. पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात असून तपासात सर्व बाबी पुढे येणार आहे. आजचा अहवाल आयोगा पुढे ठेवणार असल्याचे आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी मुश्ताक पठाण यांनी पत्रकारांना सांगितले. आठपैकी ६ आरोपी अचलपूर शहरातील आहे. अय्यान खान हा परतवाडा व मानव सुंगधे रा. आर्वी जि. वर्धा, ह. मु. अमरावती येथील रहिवासी आहे. आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. अद्यापही एकाही पिडीतेची तक्रार पोलिसांना प्राप्त झालेली नाही.