मालेगाव,
Molestation of minor girl तालुयातील शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांसह पोसो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खडकी ढंगारे येथील पीडित अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे की, गावातीलच विकास लक्ष्मण ताजणे हा गेल्या काही महिन्यांपासून तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता.
Molestation of minor girl १४ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास पीडिता तिच्या आईसोबत घराबाहेर उभी होती. त्याच वेळी आरोपीने तिला आवाज दिला. पीडितेच्या आईने विरोध केल्यावर आरोपीने खिशातून दारूची बाटली काढून घरासमोर रस्त्यावर फोडली आणि अश्लील वर्तन केले. तसेच आरोपीने पीडितेच्या आईशी गैरवर्तन करत जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनराज तायडे करत आहेत.