अनिल कांबळे
नागपूर,
murder case जुन्या वादातून भर रस्त्यावर तरुणाची हत्या करण्यात आली. अजनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जादूमहल ते सिद्धेश्वर सभागृह मार्गावर ही घटना घडली. 8 ते 10 जणांनी मिळून तरुणाचा पाठलाग करुन चाकूने वार करीत खून केला. सागर गिरधर सलामे (22, साेरंखीवाडी, सेवादलनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर त्याचा मित्र हर्षल उफर् अॅलेक्स शिंदे (25, राणी भाेसलेनेगर, भांडे प्लाॅट) हा जखमी आहे. पीयूष कैथवास, अरविंद उफर् चाेख्या, शाैर्य उफर् भुऱ्या , साहिल कावेटिया व आणखी 6 ते 7 साथीदार आराेपी आहेत. सर्व आराेपी सावित्रीबाई फुले नगर येथील रहिवासी आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांअगाेदर सागरचा काही मुलांसाेबत वाद झाला हाेता व त्याने एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण केली हाेती. बुधवारी मध्यरात्री हर्षल व सागर घराजवळील रॅलीत गेले हाेते. त्यानंतर सागरला एक ाेन आला व दाेघेही दुचाकीने सिद्धेश्वर सभागृहाजवळ पाेहाेचले. तेथे पाेहाेचल्यावर सागरने ‘मी पाेहाेचलाे’ असे समाेरील व्यक्तीला सांगितले. त्यानंतर ते समाेरील व्यक्तीच्या सांगण्यावरून जादूमहल चाैकात पाेहाेचले. थाेड्या वेळातच आराेपी दाेन माेपेडवर आले व दाेघांनाही घेरले. तेवढ्यात इतर सहकारीदेखील पाेहाेचले व त्यांनी सागर-हर्षलला घेराव घातला. ‘त्या दिवशी तूच डाेक्यावर दंडा मारला हाेता ना’ असे विचारत आराेपींनी सागरला शिवीगाळ सुरू केली. सर्वांनी दाेघांवरही लाकडी राफफ्टर, दांडा व चाकूने हल्ला केला. पीयूष व त्याच्या सहकाèयांनी सागरवर चाकूने वार केले. जखमी अवस्थेत जीव वाचविण्यासाठी सागरने सिद्धेश्वर murder case सभागृहाच्या दिशेने धाव घेतली. आराेपींनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला भरचाैकात चाकूने सपासप वार केले. त्यानंतर आराेपी फरार झाले. आराेपींनी हर्षलच्या डाेके, हात व काखेवर तलवारीने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. हर्षलच्या तक्रारीवरून सर्व आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आराेपींना अजनी पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.