नाशिक
Nashik TCS controversy नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) संदर्भातील महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक छळ आणि कथित धर्मांतरणाच्या आरोपांवरून सुरू असलेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाल्याचे दिसत आहे. या प्रकरणातील फरार एचआर मॅनेजर निदा खान हिचे दहशतवादाशी संबंधित काही व्यक्तींशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या दाव्यांमुळे तपासाची दिशा अधिक गुंतागुंतीची झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
आरोपी निदा खान सध्या भिवंडी परिसरात लपल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिचा दिल्ली स्फोट प्रकरणातील एका आरोपी डॉक्टरशी संपर्क असल्याचा संशयही काही माध्यम अहवालांमधून समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा Nashik TCS controversy तपास आता दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला असून, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणातील तक्रारी, डिजिटल पुरावे आणि कॉल डिटेल्स यांचा सखोल अभ्यास करत असल्याची माहिती समोर येत आहे. तपासासाठी सीडीआर अहवाल महत्त्वाचा ठरणार असल्याचेही सांगितले जात आहे.दरम्यान, या प्रकरणात लैंगिक छळ आणि धर्मांतरणाचे आरोप करण्यात आले असून, तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, आतापर्यंत कोणत्याही आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.