बुलढाण्याच्या अथर्व ताठेची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
National Archery Competition: Atharva Tathe आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे २६ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या १५ वी चेचुकरी लेनिन ढोला स्मृती मिनी (१५), ७ वी ‘किड्स’ (१०) व २ री किड्स (-१३) राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या अथर्व देवानंद ताठे याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. अथर्व ताठे याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत १५ गटात देशभरातून चौथा क्रमांक पटकावला. तसेच कंपाऊंड बायडिंग प्रकारात महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देत राज्याच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
 
 
Atharva Tathe
 
National Archery Competition: Atharva Tathe  यापूर्वी सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत अथर्वने राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे.अथर्वच्या या यशामागे आंतरराष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग (शिवबा आर्चरी अकॅडमी, बुलढाणा) यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्वने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अथर्वच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रात अभिमान उंचावला असून सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.