परशुराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा पुढाकार

यवतमाळ, 
Parashuram jayanti अखिल ब्राह्मण समाजाचे आराध्यदैवत भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त अखिल ब्राह्मण महासंघाद्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवांमध्ये शुक्रवार, १७ एप्रिल रोजी युवा आणि महिला कलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ. विनायक कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच दिवशी व्यावसायिक मंडळींचे अमृतपेठ प्रदर्शनसुद्धा सुरू होणार आहे.
 
 
parshuram
 
शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ते १ आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई येथील प्रख्यात तज्ञ डॉ. पायल सरवय्या, डॉ. सुनील कोहळे, डॉ. अक्षय बिडकर हे विविध तपासण्या करणार आहेत. या सोबतच मुख्यमंत्री सहायता कक्ष यवतमाळच्या सहकार्याने ‘आयुष्यमान भारत व वयोवंदन कार्ड’ कागदपत्र पूर्तता शिबिरसुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
 
 
Parashuram jayanti  दिवशी संध्याकाळी ५ वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होणार असून संध्याकाळी ६.३० वाजता नाशिकच्या ब्राह्मण बिझनेस ग्लोबल नेटवर्कचे संस्थापक श्रीपाद कुळकर्णी यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम विवेकानंद विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी व नगर परिषद उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
 
 
अक्षय तृतीया व भगवान जन्मोत्सवानिमित्त रविवार, १९ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पारंपरिक वेशभूषेत भव्य शोभायात्रेचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथून करण्यात आले असून या प्रसंगी पंढरपूर येथील विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांचे प्रमुख मार्गदर्शन आणि डॉ. संजीव जोशी यांची उपस्थिती राहणार आहे. यवतमाळच्या विविध मार्गाने मार्गक्रमण करत महिला विद्यालय, महादेव मंदिराजवळ या शोभायात्रेचे समापन होईल. या तीन दिवसीय महोत्सवात यवतमाळ शहरातील सर्व ब्रह्मवृंदांनी मोठ्या सं‘येत तन मन धनाने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.