पुणे
Pune fake baba राज्यात भोंदूबाबांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘जागरण’च्या निमित्ताने घरात ‘चेडा’ (भूत) आणल्याचा दावा करत एका कुटुंबाला मानसिक छळ आणि भीतीच्या छायेखाली ठेवण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. मंदोशी आणि राजपूर परिसरातील या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी किसन तळपे आणि मंगेश कारोटे या दोन कथित भगतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उपलब्ध ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर पुराव्यांच्या आधारे, या दोघांनी संगनमताने एका कुटुंबात फूट पाडण्याचा आणि त्यांना मानसिकदृष्ट्या गुलाम बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित Pune fake baba कुटुंबाच्या घरासमोर थडगे असल्याचे सांगत या भगतांनी भीतीचे वातावरण निर्माण केले. “घरात बाहेरचा ‘चेडा’ आणला असून त्याला कुटुंबाचा भाग बनवण्यासाठी विशेष विधी करावे लागतील,” असे सांगून त्यांनी कुटुंबीयांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. जागरणाच्या बहाण्याने त्यांनी कुटुंबीयांकडून तांदूळ गोळा करून त्याचा नैवेद्य दाखवण्याचा देखावा केला. “एकाची पोळी भाजली जाईल, बाकीच्यांची करपेल,” अशा भीतीदायक विधानांनी त्यांनी कुटुंबाला दहशतीत ठेवले.
याचबरोबर, “पोरांना पुढे केले आणि चोरांना मागे ठेवले,” अशा अपमानास्पद शब्दांत कुटुंबातील सदस्यांचा अवमान करण्यात आला. या संपूर्ण संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीडित कुटुंबाची बदनामी झाली असून त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तपासात असेही Pune fake baba समोर आले आहे की, दोन्ही भगतांनी ‘उजवा-डावा प्रसाद’ आणि ‘तांबड्या अंगाऱ्याचे’ नाटक करत दैवी शक्तीचा आभास निर्माण केला. एकमेकांकडे बोट दाखवत त्यांनी विश्वासार्हतेचा खोटा देखावा उभा केला आणि कुटुंबाचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.या प्रकारामुळे घाबरलेल्या कुटुंबाने प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्र अनिष्ट प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा २०१३ तसेच महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा २०१७ अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, तसेच ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी सायबर गुन्ह्यांतर्गत तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामागे आणखी कोणी सूत्रधार आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही पुढे आली आहे.दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूत, करणी किंवा अघोरी विधींच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांविरोधात तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.