मनुष्यातील अहंकारी व राक्षसी प्रवृत्तीचा नाश करणे हाच रामकथेचा उद्देश : राधेश्याम चांडक

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
बुलडाणा, 
Radheshyam Chandak रामकथा ही मनोरंजनासाठी नाही तर आदर्श कुटूंब कसे निर्माण होईल, बंधु प्रेम कसे वाढीस लागेल हे शिकविण्यासाठी रामकथेचे आयोजन केले आहे. ज्याचे आपल्या आई-वडिलांशी, भावाशी पटत नाही त्याचा रामकथेत येवूनही उपयोग होणार नाही. मंदिरात पाटया दिसतात ज्यांचे आपल्या भावाशी पटत नाही त्याने दर्शन घेवू नये अशी वेळ येवू नये अयोध्या येथे रामभक्तनिवासचे नुकतेच उदघाटन झाले. सुंदरकांड व भागवत कथा व रामकथा तिथे घ्यावी सर्व व्यवस्था बुलडाणा अर्बन करुन देईल असे आवाहन अयोध्या येथे शरयू तिरावर गंगेला जसी आरती होते.
 
 
ram katha
 
Radheshyam Chandak  तशीच आरती करण्याचा पायंडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला खाटूशाम ला सात दिवसाची भागवत कथा घेण्यात येईल, त्याची नोंदणी करावी असे प्रतिपादन रामकथा समारोप प्रसंगी सदभावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले. बुलडाण्यातील श्रोत्यांचा भाव सात्वीक आहे. असे गौरवोद्गार साध्वी सृष्टीलताजी यांनी काढले व पुन्हा बुलडाण्याला येवू असे आश्वासन दिले. यावेळी प्रश्नमंजुषेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बुलडाणा अर्बनेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अंजली परांजपे, लालाभाई माधवाणी, प्रकाशचंद्र पाठक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व काव्यमय आभार प्रदर्शन केले. साध्वी सृष्टीलताजी यांनी पूर्णाहुती दिली व महाप्रसादाला सुरुवात झाली. या प्रसादाचा लाभ अडीच हजारांच्यावर भक्तांनी घेतला.