स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिला...

मंत्र्याच्या पत्रामुळे एकच खळबळ

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
Subodh Savji स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे आणि व्हिडिओ जाहीर करा! अशी धक्कादायक मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. सुबोध सावजी यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना यासंदर्भात एक पत्र पाठवले असून या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्रीपद भूषवलेले बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर-लोणार मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले सुबोध सावजी अडचणीत आले आहेत
 

Subodh Savji 
 
 
सावजी यांनी पत्रात नमूद केले आहे की, बलात्काराचे दोन प्रकार असल्याचे सांगत त्यांनी “स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिला” अशा शब्दप्रयोगाचा वापर केला. अशा महिलांची नावे, फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक करावेत, जेणेकरून समाजात भीती निर्माण होईल आणि असे प्रकार कमी होतील, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, काही महिला आर्थिक किंवा स्वार्थासाठी असे कृत्य करतात आणि त्या समाजासाठी कलंक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
त्याचप्रमाणे, त्यांनी काही Subodh Savji ठिकाणी “भोंदू बाबा, संत, महात्मे किंवा आर्थिक लाभासाठी फसवणूक करणाऱ्या ठिकाणी महिला स्वतःहून जातात” असा दावा करत, अशा घटनांमध्ये सहभागी महिलांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही केली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये पीडितांची ओळख गुप्त ठेवण्याची तरतूद असून, त्याला त्यांनी आक्षेप घेतल्याचे पत्रातून दिसून येते.या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षितता आणि गोपनीयतेसंबंधी असलेल्या कायद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या विधानांवर टीका होत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या वक्तव्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.