पांढरकवडा :
Rishikesh's choice of ISRO भारत सरकार अतंर्गत इस्रोच्या वलियमला तिरुवनतंपुरम येथे अतंरिक्ष विभागातील द्रव नोंदणी प्रणाली केंद्रात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ऋषीकेश नदंकिशोर कामटकर यांची तंत्रज्ञ ‘बी’ या पदावर निवड झाली आहे. ऋषीकेश कामटकर यांनी २०२२ च्या सीटीएस परीक्षेमध्ये पांढरकवडा आयटीआय येथून एमएइइ या ट्रेडमधून भारतातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Rishikesh's choice of ISRO पांढरकवडासार‘या लहान शहरातून सामान्य कुटुंंबातील युवकाची इस्रोत निवड होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या पदावर नियुक्ती मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषदचे उपाध्यक्ष आतिष चव्हाण व माऊली दुर्गा मंडळच्या वतीने ऋषीकेशचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष पेंदोर, राहुल कात्रजवार, अभी सोयाम, नवीन करमिलकर, सुजल तावरे, ऋषभ करपते, भोयर व मित्रपरिवार उपस्थित होते.