सांगली
Sadabhau Khot राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक संघर्ष तीव्र झाला असून आमदार सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. “पवार कुटुंब कधीच पुरोगामी नव्हते,” असे म्हणत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.
सांगली येथे बोलताना खोत यांनी पवार कुटुंबाच्या राजकीय भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुरोगामी विचारसरणीचा केवळ सत्तेसाठी वापर करण्यात आला. “पुरोगामीपणाच्या आडोशाने सत्तागामी कार्यक्रम राबवला गेला,” असा आरोप त्यांनी केला. तसेच शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून मतांची राजकीय मांडणी केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंब सक्रिय प्रचारात असून त्यावरही खोत यांनी निशाणा साधला. प्रचारात कुटुंबातील सदस्यांचा सहभाग वाढल्याने राजकीय चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.
दरम्यान, खोत Sadabhau Khot यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक जवळ येत असताना अशा आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.