भिमगीत स्पर्धेत स्वरविहारच्या संतोषी झाल्टे द्वितीय

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
Santoshi Jalte came second in Bhimgeet competition. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त महिलांसाठी आंबेडकरी साहित्य अकादमी, बुलढाणा च्या वतीने ऑनलाईन भिमगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये स्वरविहार संगीत विद्यालयाच्या संतोषी झाल्टे यांनी सहभाग नोंदवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
 
santoshi
 
Santoshi Jalte came second in Bhimgeet competition आंबेडकरी साहित्य अकादमी बुलढाणा च्या वतीने घेण्यात आलेल्या या ऑनलाइन स्पर्धेमध्ये बुलढाणा शहरातील विविध महिलां स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.यामध्ये स्वरविहार संगीत विद्यालयाच्या संतोषी झाल्टे यांनी प्रसिद्ध गीतकार काशीनंद यांच्या लेखणीतून साकार झालेले आई म्हणे लेकराला रे कुलदीपा हो भीमा सारखा हे दर्जेदार गीत प्रस्तुत करून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २ जून रोजी होणार असून या सोहळ्यामध्ये विजय स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. संतोषी झाल्टे ह्या स्वरविहार संगीत विद्यालयांमध्ये नियमित शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे.त्यांना या स्पर्धेकरिता स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा.रविकिरण मोरे यांनी मार्गदर्शन केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.