नागपूर,
Shri Jain Service Society राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये श्री जैन सेवा मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात मंडळाच्या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बरखा मुणोत व स्मिता शाह यांच्या नवकार मंत्र पठणाने झाली.मागील २७ वर्षांपासून जैन सेवा मंडळ गरीब रुग्णांना संध्याकाळचे जेवण तसेच मंगळवार व गुरुवारी रुग्णांच्या नातेवाईकांनाही भोजन व फळे पुरवत आहे. आपत्कालीन परिस्थितीतही मंडळ तत्परतेने मदत करत असल्याचे वरिष्ठ डॉ. प्रशांत सोमकुंवर यांनी सांगितले.
या सातत्यपूर्ण सेवाकार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष पेंढारी होते. त्यांनी मंडळाच्या कार्याचे अभिनंदन करून ११,००० रुपयांची देणगी जाहीर केली. Shri Jain Service Society कोठारी परिवारातर्फेही ११००० रुपये देण्यात आले, तर अनंत मुकेश अंबानी फाउंडेशनतर्फे 3 लाख रुपयांची मदत प्रदान करण्यात आली.मंचावर सूरजभाई केवलरामानी, डॉ. विशाल कडू, सुभाष कोटेचा, मनोज बंड, माया गुगुलकर आदी उपस्थित होते. यावेळी मूलचंदजी सोनवने व विष्णुजी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक पियूष शाह यांनी केले. संचालन दीपक शेंडेकर यांनी तर आभार प्रदर्शन सुमत लल्ला यांनी केले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
सौजन्य:दिपक शेंडेकर,संपर्क मित्र