मराठीत लिहू–बोलू या…

संस्कारांच्या संगतीने वाढू या…

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Smita’s Creative Writing विवेक, संस्कार आणि मातृभाषेचे महत्त्व जपणारा एक सुंदर उपक्रम सध्या राबविण्यात येत आहे. “मराठीत लिहू बोलू चला, संस्कारांच्या संगे वाढू चला” या संकल्पनेतून Smita’s Creative Writing तर्फे विविध शाळा, संस्था व संस्कार वर्गांना संस्कारप्रधान पुस्तके भेट देण्यात आली आहेत.
  

56
 
 
या उपक्रमाअंतर्गत विवेकानंद विद्यालय, लोकमान्य कॉन्व्हेंट, बाल जगत, बालगोकुलम यांसारख्या अनेक संस्थांना ही पुस्तके देऊन विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढविण्यासोबतच चांगल्या संस्कारांची जपणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.आजच्या वेगवान युगात मुलांमध्ये संस्कार, मूल्ये आणि मातृभाषेचे भान टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.Smita’s Creative Writing याच उद्देशाने ही पुस्तके पालक, शाळा, संस्था आणि संस्कार वर्ग आयोजकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.उन्हाळ्याच्या सुट्टीचा उपयोग करून मुलांना मराठी भाषेत लिहिणे, बोलणे आणि संस्कारांनी समृद्ध होण्याची ही उत्तम संधी आहे. भावी पिढी घडवण्यासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सौजन्य:स्मिता देशमुख,संपर्क मित्र