अबब...हिलच्या सँडलने मारहाण

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
मुंबई
Splitsvilla controversy वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्प्लिट्सविलाच्या नव्या सिझनमध्ये पुन्हा एकदा गंभीर वाद उफाळून आला आहे. स्पर्धक आकांक्षा चौधरी हिने सहस्पर्धक दीक्षा पवारवर मारहाणीचा गंभीर आरोप करत सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे. या घटनेमुळे शोमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

 Splitsvilla controversy 
आकांक्षा चौधरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या घटनेचा तपशील दिला. तिच्या म्हणण्यानुसार, शोदरम्यान झालेल्या वादात दीक्षा पवारने तिला हिलच्या सँडलने मारहाण केली. “हे फक्त भांडण नव्हतं, ही थेट हिंसा होती. तिने मला इतके कानाखाली मारले की माझ्या ओठातून रक्त येऊ लागलं. माझ्या डोळ्यांखाली आणि मानेवर जखमांच्या खुणा होत्या,” असे तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे.
आकांक्षाने पुढे सांगितले की, ही घटना सर्वांसमोर, राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर घडली. “हा फोटो घटनेच्या १० ते १५ दिवसांनंतर घेतला, जेव्हा मला अखेर माझा फोन मिळाला. जखमा तेव्हाही स्पष्ट दिसत होत्या. हे सर्व सहन करूनही मला सांगितलं जात होतं की, असं काही घडलंच नाही,” असे ती म्हणाली.या घटनेमुळे मानसिकदृष्ट्याही मोठा धक्का बसल्याचे आकांक्षाने व्यक्त केले. “त्या दिवशी मी आतून पूर्णपणे कोसळले होते. मला एकटं आणि सुन्न वाटत होतं. शो सोडण्याचा विचार केला होता, पण मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही,” असेही तिने स्पष्ट केले.
दरम्यान, शोदरम्यान दीक्षा आणि आकांक्षा यांच्यातील वाद वाढत जाऊन तो मारहाणीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला कपडे फेकण्यापासून सुरू झालेला हा वाद नंतर चिघळला. या भांडणात आणखी एक स्पर्धक सुझानही सहभागी झाल्याची माहिती आहे.या संपूर्ण प्रकारावर शोची सूत्रसंचालिका सनी लिओन हिनेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शोमधील अशा प्रकारच्या घटनांमुळे स्पर्धकांच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, अनेकांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, या आरोपांबाबत दीक्षा पवारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.