बारामती
Sunetra Pawar राज्यातील राजकारणात सध्या बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय समीकरण चर्चेत आले आहे.दिव्यंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बारामतीतील निवडणूक प्रचारात पवार कुटुंबीय सक्रिय असून विविध नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य नेतृत्वाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जात असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांकडून त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणावे, अशी मागणी होत असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच मंत्री आदिती तटकरे यांनीही काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर या चर्चांना अधिक जोर मिळाला आहे.
दरम्यान, प्रचारादरम्यान बोलताना अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी कुटुंब एकत्र प्रचारात असल्याचे सांगितले. “लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र काम करत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक भावना व्यक्त होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे युगेंद्र Sunetra Pawar पवार यांनीही प्रचारादरम्यान प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर त्याचे स्वागतच होईल, असे मत व्यक्त केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.राजकीय वर्तुळात मात्र या वक्तव्यांकडे निवडणूक प्रचारातील राजकीय रणनीती म्हणूनही पाहिले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या चर्चांमुळे वातावरण तापले असून विरोधकांकडूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.