पाणी समजून तारपीन प्यायल्याने चिमुकल्याचा मृत्यू

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
- वाठाेड्यात हृदयद्रावक घटना

अनिल कांबळे
नागपूर, 
(Turpentine) Consumption : Incident in Wathoda area शहरातील वाठाेडा परिसरात एका निरागस चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. बाटलीतील पाणी समजून चुकून तारपीन (टर्पेंटाइन) प्राशन केल्याने अवघ्या 2 वर्षांच्या मुलाचा जीव गेला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत असून कुटुंबावर दुःखाचा डाेंगर काेसळला आहे. अद्विक शाम भदाडे (वय 2, रा. बीडगाव) असे मृत बालकाचे नाव आहे.
 
 
deatga
 
(Turpentine) Consumption : Incident in Wathoda area मिळालेल्या माहितीनुसार, अद्वविकचे वडील शाम भदाडे हे कॅटरिंगचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात रंगकाम करण्यात आले हाेते. त्यासाठी आणलेली तारपीनची बाटली कामानंतर स्टाेअर रूममध्ये ठेवण्यात आली हाेती. 12 एप्रिल राेजी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास अद्विक घराबाहेर खेळत असताना ताे स्टाेअर रूमजवळ पाेहाेचला. तेथे ठेवलेल्या बाटलीतील द्रव हे पाणी असल्याचा समज करून त्याने तारपीन पिऊन टाकली. त्यानंतर त्याची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली व ताे अस्वस्थ झाला. घडलेला प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने पारडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डाॅक्टरांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. पुढील उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शाेककळा पसरली असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त हाेत आहे. वाठाेडा पाेलिसांनी या प्रकरणाची नाेंद घेतली.