पुसदच्या विद्यालंकार्स पोदार स्कूलचा इतिहास

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
पुसद, 
Vidyalankar's Podar School केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ने जाहीर केलेल्या निकालात येथील विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलचा दहावीचा निकाल यंदाही १०० टक्के लागला आहे. सलग तिसर्‍या वर्षी उलेल्खनीय कामगिरी शाळेने केली आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 
 
kadam
 
या परीक्षेत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत गुणवंत यादीत स्थान पटकावले आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक वातावरण यामुळे हा उत्तम निकाल साध्य झाला आहे. शाळेच्या प्राचार्य राधा धागमवार यांनी सर्व यशस्वी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक आणि पालकांचेही या यशात मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि अभ्यासात कमालीचे सातत्य ठेवून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या या जिद्दीचे आणि परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 
Vidyalankar's Podar School  सलग तिसर्‍या वर्षी शाळेचा निकाल १०० टक्के असून, ०६ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक, १९ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक गुण आणि तब्बल ३७ विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. यात उत्तम गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये अंतरिक्ष अविनाश आडे ९८ टक्के, आराध्या रमेश चव्हाण ९७.४ टक्के आणि निपुण आशिष कदम ९७ टक्के आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना पोदार बोर्ड ऑफ डायरेक्टर्स शरद मैंद, सूरज डुबेवार, संतोष अग‘वाल, मनीष अनंतवार, संगमनाथ सोमावार यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन केले.