गुंजखेडा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यावर भर : आमदार राजेश बकाने
 
देवळी : पुलगाव विधानसभा क्षेत्रातील गुंजखेडा येथे दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी ‘Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Satisfaction Camp Campaign’ ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार मा. श्री राजेशजी बकाने हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मा. श्री समर्थ क्षीरसागर, गटविकास अधिकारी मा. श्री लोखंडे, नायब तहसीलदार मा. सौ. जाधवार मॅडम, देवळी नगरपरिषद उपाध्यक्ष मा. श्री राहुलजी चोपडा, निलेशजी ठाकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. वनविभागाचे गायकवाड साहेब, महावितरणचे मडामे साहेब, आर.आय. मानकर साहेब, पटवारी देहणकर साहेब यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी, तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
 
shivir
 
या शिबिरात महसूल, वीज, वन, ग्रामविकास आदी विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडले व अनेक प्रकरणे जागीच निकाली काढण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजेश बकाने म्हणाले की, “शासनाच्या योजना व सेवा या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभपणे पोहोचल्या पाहिजेत. प्रशासनाने गावपातळीवर जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविणे ही काळाची गरज आहे. अशा समाधान शिबिरांमुळे नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होतो.”
 
 
‘Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Satisfaction Camp Campaign’  तसेच त्यांनी सर्व संबंधित विभागांना नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांवर तत्परतेने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. देवळी–पुलगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक प्रशासन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.