प्रत्यक्ष सहभागाची होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अकोला-
भारत सरकारकडून यंदा देशाची १६ वी जनगणना राबवली जात आहे. ही जनगणना विशेष आहे कारण यावेळी 'डिजिटल सेन्सस' आणि 'Self-calculation' facility 'स्व-गणना' ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना सुविधेचा लाभ घेऊन se.census@gov.in या लिंक वर नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.
'Self-calculation' facility जनगणनेच्या कार्याकरिता जिल्हयातील ग्रामीण व नगरपरिषद क्षेत्रात एकुण 2 हजार 338 घर यादी गट बनविण्यात आले असुन एक घर यादी गट हा जवळपास 180-200 घरे किंवा 650 ते 800 लोकसंख्येपासुन तयार केला जातो.याकरिता एकुण 2 हजार 614 प्रगणक तसेच प्रत्येक 6 प्रगणकांकरिता 1 याप्रमाणे एकूण 426 पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.प्रशिक्षित प्रगणक 16 मे ते दि 14 जुन या कालावधीत प्रत्येक घरी भेट देऊन अॅपद्वारे माहिती नोंदवतील.जनगणनेतून मिळालेली आकडेवारी पुढील 10 वर्षांसाठी शाळा, दवाखाने, रस्ते, रेशन, पाणीपुरवठा, रोजगार योजना यांचे नियोजन ठरवते. तुमची एक अचूक नोंद म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला हातभार आहे.
प्रगणकाद्वारे १६ मे पासून नोंदणी
नागरिक तंत्रज्ञान वापरू शकत नाहीत, ज्येष्ठ नागरिक, किंवा ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांच्यासाठी २६१४ प्रशिक्षित प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16 मे ते 14 जुन या कालावधीत प्रत्येक घरी भेट देऊन अॅपद्वारे ते माहिती नोंदवतील.
स्व-गणना म्हणजे काय?
आपण स्वतः आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून जनगणनेच्या पोर्टलवर आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरू शकतो.यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाच्या आधारे लॉगिन करावे लागेल.स्व-गणना कालावधी हा दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 असा आहे, ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय आहे. शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण, शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती स्व-गणनेद्वारे भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.