वर्धा,
pure water for 1 rupee सामान्य नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा विचार करून वर्धा शहरातील महावीर उद्यानात वॉटर एटीएमचे लोकार्पण नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, नगरसेवक वंदना भुते यांच्या हस्ते करण्यात आले. १ रुपयात १ लिटर पाणी हा प्रयोग नगर पालिकेच्या वतीने विदर्भातील पहिला प्रयोग असल्याचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी सांगितले.
सध्या बोतलबंद पाण्याच्या किंमती सतत वाढत असताना या ‘वॉटर एटीएम’ द्वारे नागरिकांना केवळ १ रुपयात १ लिटर शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणीं उपलब्ध होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ म्हणाले की, स्वच्छ पेयजल हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. या विचाराने ही योजना सुरू करण्यात आली आहे. महावीर उद्यानासारख्या सार्वजनिक ठिकाणी वॉटर एटीएम बसवल्याने सकाळ-संध्याकाळ व्यायाम करणारे नागरिक, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक आणि वाटसरूंना फायदा होणार आहे. भविष्यात शहरातील इतर प्रमुख ठिकाणीही असे वॉटर एटीएम बसविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.pure water for 1 rupee
या वॉटर एटीएममध्ये अत्याधुनिक फिल्ट्रेशन सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. यात आरओ आणि यूव्ही तंत्रज्ञानाचा समावेश आहे. त्यामुळे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि सुरक्षित राहते. ही सुविधा २४ तास उपलब्ध राहणार असल्याने कोणत्याही वेळी नागरिक याचा लाभ घेऊ शकतील.