वर्धा,
vehicles registered जिल्ह्यात वाहन खरेदीचा कल सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार विविध श्रेणीतील २८ हजार ६०२ नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे.
यावर्षी दुचाकी, चारचाकी, कृषी उपयोगातील वाहने तसेच मालवाहतूक आणि प्रवासी वाहनांच्या खरेदीत वाढ झाली आहे. विशेषतः दिवाळी, दसरा, नवीन वर्ष आणि गुडीपाडवा यासारख्या सणांच्या काळात वाहन खरेदीत मोठी वाढ नोंदवली गेली. यात दुचाकीची मागणी सर्वाधिक राहिली, तर कृषी आणि मालवाहतूक वाहनांमध्येही लक्षणीय वाढ दिसून आली.
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाला ७८ कोटी १३ लाख ४३ हजार रुपयांचे महसूल उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याच्या तुलनेत विभागाने ८१ कोटी ५२ लाख ९५ हजार रुपये महसूल मिळवला. जो उद्दिष्टाच्या १०४ टके आहे. या महसुलात नवीन वाहनांच्या नोंदणी शुल्क, विविध कर, वाहन संबंधित सेवा शुल्क तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर आकारण्यात आलेल्या दंडाचा समावेश आहे.vehicles registered शुभ मुहूर्त आणि आकर्षक ऑफर्समुळे नागरिक मोठ्या प्रमाणात नवीन वाहने खरेदी करतात. हा क्रेझ आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्येही कायम राहिल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्यासाठी २०२५-२६ हे वर्ष वाहन विक्री आणि महसूल या दोन्ही बाबतीत यशस्वी ठरले आहे.
वाहन विक्रीची स्थिती (सन २०२५-२६)
दुचाकी : २२,०६०
कार : २,९०३
कन्स्ट्रशन वाहने : ४८
हार्वेस्टर : ३१
बस/ट्रॅव्हल्स : ६४
ट्रेलर (कृषी) : ३०८
ई-रिक्षा : ११०
थ्रीव्हीलर प्रवासी वाहने : ४४३
मालवाहतूक वाहने : ५५०
कृषी ट्रॅटर : १, ७८४