कारंजा लाड,
rte lottery शिक्षणाचा हक्क कायदा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देण्यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेत कारंजा तालुयातील तब्बल ९४ विद्यार्थी निवडले गेले आहेत. या विद्यार्थ्यांना तालुयातील विविध नामांकित इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार असल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यामुळे गरीब व वंचित घटकांतील मुलांना खाजगी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळते. या वर्षीही मोठ्या संख्येने पालकांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यातून पारदर्शक पद्धतीने संगणकीय लॉटरी काढून ही निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून २० एप्रिल पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.rte lottery शिक्षण विभागाने यासाठी निश्चित कालमर्यादा दिली असून, त्या वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाऊ शकते. या निवडीमुळे अनेक कुटुंबांचे आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
असे आहेत शाळानिहाय विद्यार्थी
लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोविंद इंग्लिश स्कूल, कारंजा येथे २४, वेदांत पब्लिक स्कूल, पोहा येथे १५, श्रीमती सितादेवी गोलेच्छा कॉन्व्हेन्ट, कारंजा येथे ७, प्रियदर्शिनी कॉन्व्हेन्ट, कारंजा येथे २७, नारायण महाराज विद्यालय, कारंजा येथे ८, कस्तुरी इंग्लिश स्कूल, कामरगाव येथे ९ आणि झील इंटरनॅशनल स्कूल, कारंजा येथे ४ अशा एकूण ९४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.