चालकाची प्रकृती गंभीर
उमरखेड,
शहरालगतच्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण accident अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. बुधवार, १५ एप्रिल रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास गिट्टीने भरलेला टाटा कंपनीचा छोटा टिप्पर नागपूर-तुळजापूर महामार्गावरून भरधाव जात होता. बायपासवर कुलस्वामिनी धाब्याच्या बाजूला चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी टिप्परने रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक दिली आणि वाहन जागीच पलटले.
या accident अपघातात चालकाच्या बाजूला बसलेला चंदू अशोक राठोड (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक निलेश बालाजी काळे (वय २१) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नांदेडला हलविण्यात आले आहे. हे वाहन स्थानिक वीट उत्पादक अमोल काळबांडे यांचे असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वाहनाकडे आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचीही माहिती आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश मुंडे व संदीप जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.