समन्वय, नियोजन आणि अंमलबजावणीद्वारे प्रगती साध्य करा : जिल्हाधिकारी कुंभेजकर

नीती आयोगाची आढावा बैठक

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
वाशीम,
dc kumbhejkar जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन आणि एकत्रित समन्वयाने कामे पूर्ण करावीत. प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याची भूमिका स्वीकारून नागरिकहिताचे निर्णय तातडीने राबवावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
 

नीती आयोगाची आढावा बैठक 
 
 
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रविण खंडारे , मुख्यमंत्री फेलो संकेत नरुटे, उपशिक्षणाकारी गजानन डाबेराव व यंत्रणा प्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी क्षेत्राला प्राधान्य शेतकर्‍यांचे हित लक्षात घेता पिकांना योग्य व स्थिर बाजारभाव मिळावा यासाठी आवश्यक प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. चिया पिकाचे उत्पादन वाढीस लागले असून बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकर्‍यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील नियोजन व आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली.
 
ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अत्यावश्यक नियोजन आवश्यक असल्याचे प्रभारी अधिकार्‍यांनी यावेळी नमूद केले.आरोग्य व पशुसंवर्धनावर विशेष भरगर्भवती महिलांची तपासणी, उपचार सुविधा आणि शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण यावर विशेष भर देण्यात आला. आरोग्य योजनांच्या निधीचा योग्य वापर करून नागरिकांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळाल्या पाहिजेत, असे निर्देश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. लाळखुरकत प्रतिबंधात्मक लसीकरण प्रभावीपणे राबवून पशुधनाचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.युवकांना रोजगार संधी - प्रशिक्षण कार्यक्रमात वाढयुवकांमध्ये कौशल्य विकास वाढीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासोबतच शासनाच्या योजनांची माहिती आणि रोजगार संधी युवकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या. अभ्यासक्रम व कोर्सेसच्या अंमलबजावणी साठी योग्य प्रस्तावांसह मागणी करावी, असेही यावेळी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या.
 
पीएमश्री शाळांमध्ये सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भरकेंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पीएमश्री स्कूल अंतर्गत जिल्ह्यात सध्या १६ शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये अपेक्षित सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे व शाळांचा दर्जा उंचावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.dc kumbhejkar प्रत्येक शाळा डिजिटल करण्यावर विशेष भर देण्यात यावा. सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे ज्या भागात विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात. ग्रामीण व शहरी भागात आरोग्य, स्वच्छता व पोषण याबाबत जनजागृती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्हा व आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण, पोषण, कृषी, पायाभूत सुविधा व कौशल्य विकास आदी क्षेत्रांतील निर्देशांकांची पूर्तता करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदार्‍या निश्चित करून उद्दिष्टपूर्तीसाठी वेळबद्ध कृती आराखडा तयार करून तात्काळ अंमलबजावणी करावी.असेही त्यांनी स्पष्ट निर्देश यंत्रणांना दिले. बैठकीस यंत्रणा प्रमुख व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.