‘आप’ नेत्यांवर छाप्यांची मालिका...अरोरा यांच्यावर कारवाई

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
चंदीगड,
Action taken against AAP leader Arora पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून सुरू असलेल्या कारवाईत आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या लुधियाना येथील निवासस्थानी शुक्रवारी पहाटे छापा टाकण्यात आला. तपास पथक सकाळी लवकर त्यांच्या घरी दाखल झाले असून परिसरात केंद्रीय सुरक्षा दलाची कडेकोट व्यवस्था करण्यात आली होती. याचबरोबर अरोरा यांच्याशी संबंधित इतर ठिकाणीही झडती घेण्यात आली.
 
 
 
AAP leader Arora
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई आर्थिक गैरव्यवहार आणि जमीन व्यवहारातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सुरू करण्यात आली आहे. गुरुग्राम, चंदीगड, लुधियाना आणि जालंधर या शहरांमध्ये एकूण तेरा ठिकाणी झडती मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत अरोरा यांच्यासह काही व्यावसायिक आणि त्यांच्या कंपन्यांच्या कार्यालयांचा समावेश होता. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, काही कंपन्यांनी औद्योगिक वापरासाठी असलेल्या जमिनीचा वापर निवासी प्रकल्पांसाठी करून शासनाला मोठा आर्थिक तोटा पोहोचवला आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर नफा कमावला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या व्यवहारांमध्ये जमिनीच्या वापरात अनधिकृत बदल, बनावट व्यवहारांद्वारे भागभांडवलाच्या किमती वाढवणे आणि शेअर बाजारातील अंतर्गत माहितीचा गैरवापर करून नफेखोरी केल्याचेही आरोप आहेत.