- अंबाझरी तलावावरुन दाेघी मायलेकीला वाचवले
- आर्थिक चणचणीमुळे आत्महत्यासाठी प्रवृत्त
अनिल कांबळे
नागपूर,
घरातील बिघडलेली आर्थिक स्थिती आणि डाेक्यावर असलेला कर्जाचा डाेंगर असह्य झाल्यामुळे मायलेकींनी थेट अंबाझरी तलाव गाठले. दाेघींनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन काठावर उभ्या राहून रडत हाेत्या. तलावात उडी घेणार ताेच Bajajnagar Police बजाजनगर पाेलिस ठाण्यातील दाेन पाेलिस अंमलदार देवदूत बनून आले. त्यांनी प्रसंगावधान राखून दाेघींवर झडप घालून ताब्यात घेतले. पाेलिसांच्या सतर्कतेमुळे मायलेकीचा जीव वाचला. या दाेन्ही कर्मचाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र काैतूक हाेत आहे. नरेंद्र केवटे आणि पंकज राठाेड असे त्या देवदूत पाेलिस कर्मचाèयांची नावे आहेत.
Bajajnagar Police शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता अंबाझरी तलावावर तुरळक गर्दी हाेती. दरम्यान रामेश्वर चाैकात राहणाऱ्या 42 वर्षीय आणि 21 वर्षीय दाेन महिला तलावावर पाेहचल्या. दाेघीही एकमेकींकडे बघून रडत हाेत्या. दाेघींनीही चर्चा केली आणि एकमेकींना मिठी मारली. हा सर्व प्रकार एका युवकाने बघितला. त्याने लगेच पाेलिसांना माहिती दिली. यादरम्यान, बजाजनगरचे ठाणेदार चेतन चव्हाण यांना माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच त्या भागात गस्त घालणारे पाेलिस कर्मचारी नरेंद्र केवटे आणि पंकज राठाेड यांना त्वरित अंबाझरी तलावावर पाठवले. दाेघेही वेगात वाहन चालवून तलावावर पाेहचले. त्यावेळी दाेन्ही महिला पाण्यात उडी घेण्याच्या तयारीत हाेत्या. ताेच दाेन्ही पाेलिस कर्मचाèयांनी शिताीने महिलांजवळ पाेहचून त्यांना ताब्यात घेतले. दाेन्ही महिला आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत हाेत्या. त्यांना ताब्यात घेऊन पाेलिस ठाण्यात आणले. ठाणेदार चेतन चव्हाण यांनी दाेघींचीही आस्थेने विचारपूस केली. त्या दोन्ही कर्मचाऱ्यांचा पोलिस ठाण्यात पुष्पगुच्छ देऊन ठाणेदार चव्हाण यांनी सत्कार केला, हे विशेष.
मायलेकी गेल्या नैराश्यात
ही तरुणी माझी मुलगी असून ती बी.एस्सी पदवीधर आहे. ती सध्या नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असून आमची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च झेपावत नाही. पती माेलमजुरी करतात. त्यांच्यात कमाईवर घर चालते. मात्र, आता हाताला काम नसल्यामुळे मुलीचे पुढील शिक्षण पूर्ण हाेऊ शकणार नाही, ही चिंता गेल्या काही दिवसांपासून सतावत हाेती. त्यातूनच आम्ही दाेघेही मायलेकीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला हाेता, अशी माहिती त्या महिलेने पाेलिसांना दिली.
समजूत आणि समूपदेशन
ठाणेदार चव्हाण यांनी मायलेकींची समजूत घातली. तसेच समूपदेशन करीत चुकीचे पाऊन न उचलण्याबाबत आश्वस्त केले. मायलेकींनी पाेलिस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाला सकारात्मक घेतले. मुलीलाही काहीतरी काम करुन शिक्षणासाठी पैसे गाेळा करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दाेघीही मायलेकींना सुरक्षितपणे नातेवाईकांसाेबत घरी पाठविण्यात आले.