‘समता पर्व-२०२६’मध्ये घुमला सुरांचा नाद
प्रेम तेलंग द्वितीय स्थानी
यवतमाळ,
Bhagyashree Khanode: ‘Yavatmal Idol..!’ शहरातील ‘समता पर्व-२०२६’ अंतर्गत आयोजित ‘यवतमाळ आयडॉल’ या भव्य संगीत स्पर्धेचा सूरमयी समारोप पार पडला. नवोदित गायकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत भाग्यश्री पूर्णाजी खानोदे हिने आपल्या सुमधुर गायकीने प्रेक्षकांची मने जिंकत प्रथम क‘मांकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत प्रेम परमेश्वर तेलंग याने द्वितीय आणि स्वरांगिनी कुडमेथे (यवतमाळ) हिने तृतीय क‘मांक पटकावले. गेल्या २२ वर्षांपासून यवतमाळच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क‘ांती घडविणार्या ‘समता पर्वा’ने यंदा या स्पर्धेने संगीत क्षेत्रात नवे चैतन्य निर्माण केले. ‘हिर्याला पैलू पाडल्याशिवाय त्याची चमक दिसत नाही’ या उक्तीप्रमाणे या स्पर्धेने अनेक गुणी गायकांना आपली कला सादर करण्याची उपलब्ध करून दिली.
Bhagyashree Khanode: ‘Yavatmal Idol..!’ या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. विशाखा खोब‘ागडे, लावण्या वखरे, शुभम विरुटकर, पवन नागपुरे आणि अंश फुलमाळी यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. या सुरांच्या मैफिलीत परीक्षक म्हणून तालमणी धीरेंद्र गावंडे आणि संगीत शिक्षक शीला गायकवाड यांनी जबाबदारी पाडली. या दिमाखदार सोहळ्याचे संचालन मुख्य संयोजक काजल तायडे यांनी केले. तर मुख्य संयोजक म्हणून अभियंता धर्मपाल भितकर यांनी धुरा सांभाळली. या स्पर्धेसाठी ‘समता पर्व-२०२६’चे अध्यक्ष नारायण थूल, कार्याध्यक्ष सुमेध देवतळे, राजू चांदेकर, सचिव डॉ. विलास कनाके, आयोजक प्रा. अंकुश वाकडे, प्रा. प्रिया वाकडे, अॅड. रामदास राऊत, प्रवक्ता उमेश महिला मुख्य संयोजक माधुरी अनिल आडे, प्रसिद्धिप्रमुख हेमंत कांबळे, कोषाध्यक्ष प्रमोदिनी रामटेके, संघटक संजय बोरकर, मार्गदर्शक शंकर नारनवरे व माजी अध्यक्ष माधुरी वाळके यांनी पुढाकार घेतला.