वर्धा,
BJP Yuva Samvad Sampark campaign भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्ह्याच्या वतीने आयोजित युवा संवाद संपर्क अभियानाचा १५ एप्रिल रोजी शुभारंभ झाला. अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या काळात या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक युवकांशी संवाद साधून त्यांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
BJP Yuva Samvad Sampark campaign भाजयुमो जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे यांनी येत्या काळात या अभियानाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक युवकांशी संवाद साधून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा आमचा मानस असल्याचे शिंदे यांनी कळवले आहे. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, महामंत्री कमलाकर निंबोरकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली येरावर, नपचे उपाध्यक्ष प्रदीप ठाकुर, शहर अध्यक्ष निलेश किटे, अक्षय राजुरकर, संतोष तिवारी, मनोज आगरकर आदी उपस्थित होते.