कारची ३ वाहनांना धडक; ५ जखमी

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
कडाजना शिवारातील भीषण अपघात
 
हिंगणघाट, 
Car accident भरधाव कारने तीन वाहनांना धडक दिली. यात ५ जण जखमी झाले. तालुयातील कडाजना शिवारात गुरूवार १६ रोजी रात्री ८. ३० वाजताच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. ३२ ए. एच. ८४४४ क्रमांकाचा कार चालक नंदोरी मार्गाने हिंगणघाट शहरात येत असताना तीन दुचाकींना धडक दिली.
 
 
acc
 
Car accident  वाहनांना धडक दिल्यावर अनियंत्रित कार पलटली. कार चालकाने कारमधून बाहेर येत घटनास्थळावरून पोबारा केला. या अपघातात प्रज्वल गायकवाड (२५) रा. आदर्शनगर संत तुकडोजी वॉर्ड, संजय गोटे (२६) रा. संत तुकडोजी वॉर्ड, अमित जवादे (३४) रा. शेगाव गोठाडे, प्रांजुषा जवादे रा. शेगाव गोठाडे व जयेश मडावी रा. नन्नाशाहा वॉर्ड हे जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयाकडे रवाना केले.