नागपूर,
CBSE Class 10 Results नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता दहावीच्या AISSE परीक्षेत सोमलवार मा-उमिया शाखेने यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता यादीत आपले स्थान कायम राखले आहे.शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये या शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेतील एकूण ५७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांनी यश मिळवत शाळेचा गौरव वाढवला. विशेष म्हणजे ११ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
IT विषयात तीन विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली, तर सामाजिक शास्त्र विषयात एका विद्यार्थ्यानेही शंभर टक्के गुण प्राप्त केले. CBSE Class 10 Results विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीमुळे हे यश शक्य झाले.सोमलवार शिक्षण संस्थेचे सचिव श्री. प्रकाश सोमवार तसेच संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मावती सिंग यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा मोलाचा ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
सौजन्य:सरिता कोकर्डेकर, संपर्क मित्र