विरंगुळा महिला मंडळाचा चैत्रोत्सव उत्साहात

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नागपूर,
chaitrotsav-nagpur विरंगुळा ज्येष्ठ महिला मंडळाचा चैत्रोत्सव लक्ष्मी नगर येथील सिद्ध हनुमान मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरले.
 

mnl 
 
 
यावेळी चैत्रगौरीची आकर्षक आरास करण्यात येऊन पूजन व आरती पार पडली. त्यानंतर मंडळाच्या नवीन सदस्यांनी स्वतःचा परिचय करून दिला.chaitrotsav-nagpur वसुधा शिलेदार यांनी ‘अमृतकण’ अंतर्गत सुविचार मांडले, तर चित्रा डोके यांनी रामचरित मानसातील रामावताराशी संबंधित अप्रचलित कथांचे प्रभावी निरूपण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अनघा फडके यांनी केले. शेवटी हळदी-कुंकू समारंभ पार पडून आंब्याची डाळ व पन्हे यांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आशा गोखले, अध्यक्षा विजया विघ्ने तसेच कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी केले.
सौजन्य:संजीव डोके,संपर्क मित्र