धनादेश अनादर; जामिनदाराला ६ महिन्यांची शिक्षा

*५ लाखांचा दंडही ठोठावला

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
वर्धा,
cheque dishonour धनादेश अनादरच्या एका प्रकरणात वर्धा येथील न्यायालयाने जामिनदाराला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने व्यावसायिक रितेश गांधी यांना ६ महिन्यांच्या कारावासासह ५ लाख रुपयांचा दंड व भरपाई देण्याचा आदेशित केले आहे. तसेच, निर्धारित रक्कम जमा न केल्यास अतिरित ४ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देखील ठोठावली आहे. हा निकाल तृतीय अतिरित मुख्य न्याय दंडाधिकारी वर्धा स्वाती फुलबांधे यांनी दिला.
 
 
cheque dishonour
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०१९ मध्ये कर्जदार विशाल भाके यांनी जय महाकाली नागरी सहकारी पतसंस्था, वर्धा येथून ४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी रितेश गांधी जामिनदार होते. कर्जफेडीसाठी जामीनदार म्हणून रितेश गांधी यांनी पतसंस्थेला ४ लाख रुपयांचा धनादेश दिला.cheque dishonour मात्र खात्यात पुरेशी रकम नसल्यामुळे तो धनादेश वटला गेला नाही. पतसंस्थेने वारंवार रकम भरण्याची मागणी करूनही आरोपीने पैसे जमा न केल्यामुळे संस्थेने न्यायालयात दाद मागितली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे पुरावे व युतिवाद ऐकून आणि सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून न्यायालयाने गांधी यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. या प्रकरणात फिर्यादी संस्थेच्या वतीने अ‍ॅड. अमोल तळवेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.