भोंदू खरातच्या निकटवर्तीयाचा 'समृद्धी' महामार्वगावर अपघाती मृत्यू!

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर/शिर्डी
Jitendra Shelke death समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात भोंदू अशोक खरात यांचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संबंधित वर्तुळात शोककळा पसरली असून अपघाताच्या कारणांबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
 

 Chhatrapati Sambhajinagar accident update, container truck collision India, Shivnika Trust Jitendra Shelke death 
शिर्डीजवळील धोत्रे गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली आणि शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात त्यांच्या Jitendra Shelke death पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर जखमींना बाहेर काढले. सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.जितेंद्र शेळके हे भोंदू खरात यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. ते शिवनिका ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते तसेच खरात यांच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. काही प्राथमिक माहितीनुसार, भोंदू खरात यांच्या अटकेनंतर ते मानसिक तणावात असल्याचेही सांगितले जात आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
 
दरम्यान, अपघातानंतर संबंधित ट्रक किंवा कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा अपघात नेमका कसा घडला, यामागे निष्काळजीपणा होता की अन्य काही कारण, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे घटनेचा मागोवा घेतला जात आहे.