सिनेस्टाईल गँगवार भरचौकात गोळीबार

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
gang war शहरातील पुंडलिकनगर परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचे थरारक दृश्य समोर आले असून दोन गटांमध्ये झालेल्या गँगवारमध्ये भरचौकात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Chhatrapati Sambhajinagar gang war 
प्राथमिक माहितीनुसार, पवन दिवेकर टोळीशी संबंधित ‘पीडी कंपनी’ या गटाकडून हा गोळीबार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अचानक घडलेल्या या सिनेस्टाईल हल्ल्यामुळे रस्त्यावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. गोळीबारानंतर दोन्ही गटातील आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे समजते.
घटनेची माहिती gang war मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.या घटनेनंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून काही दिवसांपासून वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती गोळा करण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेमागील नेमका वाद काय होता, तसेच गोळीबारामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. शहरात वाढत्या गँगवारच्या घटनांमुळे पोलिसांनी गस्त वाढवली असून कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.