कोतवाली पोलिस ठाण्यात डॉ .आंबेडकर जयंतीनिमित्त बालस्पर्धा

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |

poice
 
 
अनिल कांबळे
नागपूर, 
Children's competition at Kotwali Police Station डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोतवाली पोलिस ठाण्यात शाळकरी मुला-मुलींसाठी विविध ज्ञानवर्धक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.महिला पोलिस अंमलदारांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात पेंटिंग, गीतगायन, प्रश्नमंजुषा तसेच विविध खेळांचा समावेश होता. स्पर्धांमधून मुलांच्या कौशल्यांना वाव देत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाला सहायक पोलिस आयुक्त अनिता मोरे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक रितेश अहेर उपस्थित होते. त्यांनी मुलांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
 
 

poice 
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन पोलीस ठाणे कोतवाली येथील महिला अधिकारी व अंमलदार   पोउपनि शिंदे, जासूद, सुनिता लोखंडे, मपोहवा सविता ताम्हणकर, प्रतिभा, मपोअं अंबिका रणनवरे, भावना घोडके, प्रीती तामगाडगे, रोशनी इरदांडे, सोनाली कोहळे, श्वेता गुलबासे, मंदा मेंडके, काजल वर्मा, प्रीती जाधव, ज्योती सिडाम यांनी केले. तसेच पोलीस अंमलदार विजय रामटेके यांनी कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था उत्तम प्रकारे पार पाडली.स्पर्धेत सहभागी विद्यार्थी  फालगुनी रणनवरे, अद्वेद्र रणनवरे, बुद्धांश सहारे, समायरा घोडके, रिधान घोडके, स्वरा जुमडे, स्वरा आगलावे, समायरा जाधव, विहान पाटील, आरोही पाटील, मिताली जांभुळकर, माहेश्वरी लांबट, सुशांत भालेराव, पार्थवी भालेराव, नेत्रा सहारे, प्रभांश सहारे, लावण्या भगत, समृद्धी भगत, नित्यांश बोडखे यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.यावेळी सर्व मुलांना प्रोत्साहन देण्यात आले तसेच करिअरविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमानंतर पोलिस अंमलदार व कुटुंबीयांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.