सोनेगाव तलाव सुरक्षेसाठी आयुक्तांचा दौरा

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Sonegaon Lake safety प्रभाग ३६ अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव तलावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विपीन इटणकर यांनी नुकताच दौरा केला. तलाव परिसरातील रखडलेली कामे लवकर पूर्ण व्हावीत, तसेच सुरक्षाव्यवस्था मजबूत व्हावी, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ आदेश दिले. अलीकडेच सोनेगाव तलावात एका युवक व युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात युवतीला वाचवण्यात यश आले, मात्र युवकाचा मृत्यू झाला. यापूर्वीही येथे तीन आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेविका माया हाडे यांनी तलावाच्या सुरक्षेसाठी व कामांना गती देण्यासाठी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
 
Sonegaon Lake safety
 
यानंतर आयुक्तांनी तत्काळ तलाव परिसराची पाहणी करून सुरक्षाव्यवस्था वाढविणे, तसेच सौंदर्यीकरणाची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. Sonegaon Lake safety यावेळी मनपा अधिकारी व बॅनर्जी उपस्थित होत्या. यावेळी नगरसेविका माया हाडे, नगरसेवक ईश्वर ढेंगळे तसेच स्थानिक नागरिकांनी तलावाच्या सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि सुरक्षेसंदर्भात आयुक्त व मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सौजन्य: माया हाडे, संपर्क मित्र