नागरिकांना दिलासा !
उमरखेड,
Construction on Umarkheed road पुसद ते हरदडा या हायब्रीड अन्युटी मॉडेल अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला पुन्हा गती मिळाली आहे. शहरातील या रस्त्याचे काम काही दिवसांपासून बंद असल्यामुळे अर्धवट बांधकामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. धुळीचे प्रमाण सततची वाहतूक कोंडी आणि विस्कळीत व्यवस्थेमुळे नागरिकांत तीव‘ नाराजी होती. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी सोशल मिडियावर संतप्त प्रतिकि‘या व्यक्त करत आंदोलनाचा इशाराही दिला होता. रस्त्याचे काम अचानक थांबण्यामागे वाढीव कामासाठी मंजुरी नसल्याचे कारण समोर आले होते.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार किसन वानखेडे यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करत वाढीव मागणी लावून धरली. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपयांच्या वाढीव प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दगुरुवार, १६ एप्रिलपासून उमरखेड शहरातील अर्धवट रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. संबंधित कंपनी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
Construction on Umarkheed road सध्या पुसद मार्गावर विविध पूल तसेच सिमेंट रस्त्याचे काम वेगाने सुरू असून ढाणकी रस्त्यावरही काम प्रगतीपथावर आहे. मात्र, एकेरी वाहतुकीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. एकूणच, रखडलेले काम पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होण्याकडे सर्वांचे लागले आहे.