भव्य योग शिबिरात नगरसेविका माया हाडे यांचा सत्कार

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नागपूर,
grand yoga camp नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पतंजली योग शिबिरात प्रभाग ३६ च्या नगरसेविका माया हाडे व अरविंद हाडे यांचा आदरणीय स्वामी श्री परमार्थ देव महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ईश्वर देशमुख कॉलेजच्या प्रांगणात पार पडलेल्या या भव्य योग शिबिरात योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. यावेळी ऋतुदेवज महाराज, काटेकर, येवले तसेच माधुरी यांनी त्यांना आशीर्वाद दिले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने योगप्रेमी उपस्थित होते.
 
 
grand yoga camp
सौजन्य: माया हाडे, संपर्क मित्र