सिलिंडर टंचाईवर शिष्टमंडळाचे निवेदन

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नागपूर,
cylinder shortage शहरी आणि ग्रामीण भागात वाढत्या गॅस सिलिंडर टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांना तासन्‌तास लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत असून, सदोष वितरण प्रणालीमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका व सचिव तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
 
nagpur
  
या चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने सर्वसामान्य नागरिक, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारी कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांचा सविस्तर आढावा मांडला. सकाळपासून रांगेत उभे राहण्याची वेळ येणे, घरपोच गॅस वितरण बंद असणे, तसेच ऑनलाइन बुकिंग करूनही सिलिंडर वेळेवर उपलब्ध न होणे या प्रमुख अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी तत्काळ कारवाईचे निर्देश दिले असून, लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणून नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. cylinder shortage या शिष्टमंडळात ग्राहक न्याय परिषदेचे प्रमुख डॉ. विप्लव मजूमदार, संदीप हाडके, मोहन ठाकरे आणि अंकिता नगरारे उपस्थित होते.
सौजन्य: देवराव प्रधान/रजनी चौहान, संपर्क मित्र