पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन
जिल्ह्यातील प्रकल्प, मिळणार गती
यवतमाळ,
जिल्ह्यात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय गतिमानता आणि सुशासनाच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या District 'War Room' जिल्हा ‘वॉर रूम’चे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आणि आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मु‘य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या जिल्हा ‘वॉर रूम’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व विभागांचे कामकाज, प्रकल्पांच्या प्रगतीची देखरेख अर्थात मॉनिटरिंग केले जाणार आहे.
District 'War Room' तसेच सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तथ्यांवर आधारित निर्णय घेवून प्रशासन अधिक पारदर्शक व प्रभावी बनविणे, योजनांच्या एकसूत्रता आणणे, नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी ही वॉर रूम कार्यरत राहणार आहे. यासह आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, महसूल, कृषी या विभागांसह सुमारे ३० विभागांच्या योजनांचे मॉनिटरिंग केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाचा एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकार्यांच्या संकल्पनेतून या ‘वॉर रूम’ची निर्मिती करण्यात आली त्याचे संपूर्ण कामकाज अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. त्यामध्ये उभारी पोर्टल, महा ई-सेवा, डॅशबोर्ड, मोबाईल अॅप्स, हेल्पलाईन आदींचा समावेश असणार आहे.