शिक्षण, समानता आणि मानवतेच्या मूल्यांवरच समाजाचा खरा विकास

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
- जि.प. अध्यक्ष भेंडारकर यांचे प्रतिपादन
- वडेगाव/बंध्या येथे जयंती महोत्सवानिमित्त समाज प्रबोधन

अर्जुनी मोरगाव, 
शिक्षण, सामाजिक जागृती, समानता आणि मानवतेच्या मूल्यांवर सखोल विचार मांडले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांचा अंगीकार केल्यासच समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले. वडेगाव/बंध्या येथे पंचशील बौद्ध समाजाच्या सौजन्याने महात्मा ज्योतिबा फुले तसेच Dr. Babasaheb Ambedkar Jayanti डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
 
 
 
gon
 
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  कार्यक्रमाला जि.प. सदस्य श्रीकांत घाटबांधे, वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश घुटके, सरपंच घनश्याम शहारे, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष योगेश नाकाडे यांच्यासह आनंद चंद्रिकापुरे, पूणाराम जगझापे, मिथुन मेश्राम, कैलास हांडगे, संजीव लोणारे, नरेश शेन्डे (सुभेदार), सुशिल रामटेके, नकटु मेश्राम, प्रेमदास गहाणे, अरुण मस्के, किशोर शेन्डे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास परिसरातील महिला व पुरुष मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पुढे बोलताना समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणाला प्राधान्य देऊन समतेच्या तत्त्वावर आधारित समाज निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.