उत्तर प्रदेशातील चालकाचा देवरीच्या बाघनदीत बुडून मृत्यू

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
गोंदिया, 
उत्तर प्रदेशातील एका वाहन Driver dies in Bagh River चालकाचा देवरी तालुक्यातील शिरपूर परिसरातून वाहणार्‍या बाघनदी पत्रात बडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. प्रेम सिंग (३४) रा. बरेली (उ.प्र.) असे त्या मृत चालकाचे नाव आहे.
 
 
Bagh River
 
Driver dies in Bagh River  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रेम सिंग हे आपल्या वाहनासह या भागात आले होते. दरम्यान, काही कारणास्तव ते बाघनदीच्या पात्रात उतरले असता पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गेले आणि त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. नदीचे शांत भासणारे पाणी क्षणार्धात जीवघेणे ठरले, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षाने तत्काळ घटनास्थळ गाठून शोध व बचावकार्याला सुरुवात केली. दरम्यान, बचाव पथकाने अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर प्रेम सिंग यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. दरम्यान, नागरिकांनी नदीकाठावर वावरताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.