नक्षलग्रस्त भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Naxal-affected areas गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात कार्यरत असलेले माऊली सेवा मित्र मंडळ नागपूर हे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या संस्थेकडून होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, सायकली, तसेच पुस्तके यांचे वाटप नियमितपणे करण्यात येते. अलीकडेच गोंदिया जिल्ह्यातील मगर डोह परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील चौथीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके भेट देण्यात आली.
 
 
nagpur
 
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची आवड व प्रेरणा वाढण्यास मदत झाली. विशेष म्हणजे, या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने केली जात आहे. Naxal-affected areas नक्षलग्रस्त भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी माऊली सेवा मित्र मंडळाचे हे कार्य मोलाचे ठरत असून समाजाकडून त्याचे कौतुक होत आहे.
 
सौजन्य: सुहास खरे, संपर्क मित्र