'एक दिन' मनाला भिडणारी प्रेम कथा

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Ek Din movie आमिर खान प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘एक दिन’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांसमोर एक सुंदर, मनाला भिडणारी प्रेमकथा घेऊन येणार आहे. या चित्रपटात साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यात जादूने भरलेली प्रेमकथा अत्यंत सुंदरपणे सादर करण्यात आली आहे.
 

Ek Din movie, Aamir Khan Productions, Junaid Khan debut film, 
‘एक दिन’मध्ये जुनैद खान यांनी एका लाजाळू आणि थोड्या वेगळ्या स्वभावाच्या तरुणाची भूमिका साकारली आहे, ज्याला साई पल्लवी वर प्रेम जडते. साई ही आनंदी आणि जिंदादिल मुलगी आहे. दोघे एकाच कार्यालयात काम करत असले तरी जुनैद तिला आपली भावना व्यक्त करू शकत नाही. कथेत मोठा वळण तेव्हा येतो, जेव्हा जपानमध्ये साईचा अपघात होतो आणि ती ‘क्षणिक स्मृतिभ्रंश’ या आजाराची शिकार होते. या अवस्थेत तिला फक्त जुनैदच आठवत राहतो, कारण त्यानेच तिचे प्राण वाचवलेले असतात. या वळणामुळे कथा अधिक रंजक बनते आणि पुढे ही प्रेमकथा कोणत्या दिशेने जाते, हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.
ट्रेलर पाहिल्यानंतर Ek Din movie हे स्पष्ट होते की एक कोमल, हळुवार आणि हृदयाला भिडणारी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा प्रेमावर विश्वास ठेवण्याची, आशा जपण्याची आणि आयुष्यातील जादूची वाट पाहण्याची आहे. खूप दिवसांनी अशी वेगळी आणि भावनिक कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.